Internet वरिल मराठीचे स्थान.

नमस्कार मंडळी ,

एकदा असेच नेटवर बसून काही तरी शोधत होतो. तेव्हा माझ्या लक्षात आल की प्रत्येक वेळा शोधतांना गुगल वर पानं किती आहेत ,त्याची संख्या देतात. मग गंमत म्हणुन मी मराठी हा शब्द शोधला . त्यानंतर हा खेळ करत असतांना माझ्या मनात मराठी Internet  वर किती प्रसारीत आहे , ते पाहावे असे आले. मी शोध सुरु केला.

मला जे सापडले ते आश्चर्याचकित करणारे होते(मलातरी). ते फ़क्त माझे भय असेल ,पण तरी मला मिळालेली माहिती मी आपणासोबत वाटत आहे. ही माहिती संख्येच्या रुपात आहे.

भाषा            भाषा बोलणारी लोकसंख्या जगातील
१.इंग्रजी –         ३५0,000,000
२.हिंदी   –         २00,000,000
३.बंगाली –         १७0,000,000
४.तेलगू  –              ६९,६६६,000
५.मराठी –          ६८,0२२,000 (लोकसंख्येबाबत वाद असू शकतो)
६.तमीळ –             ६६,000,000
७.गुजराती-            ४६,१00,000
-स्त्रोत Encarta  .

काही आकडे. अजूनही भाषा असतील ,मी फ़क्त असलेल्या भाषेतील क्रमवारी दिली आहे. खालिल संख्या सापडले्ले शब्द आहे.

१.Google Search

1.  इग्रजी  –      १,८९0,000,000
2.  हिंदी   –         १५९, 000,000
3.  तमीळ –            ६२,३00,000
4.  तेलगू  –           ३४,३00,000
5.   बंगाली –         २२,000,000
6.  कन्नड –           २०,९00,000
7.  मल्याळम –       १९,७00,000
8.  मराठी   –      १५,000,000

२. Youtube search
1.   इग्रजी             ९८६,000
2.   हिंदी               १८४,000
3.   तमीळ            १४७,000
4.   तेलगू               ६७,७00
5.   मल्याळम         ६१,७00
6.  कन्नड              २५,५00
7.  बंगाली              २५,१00
8.  मराठी            १४,५००

३. Wikipedia  तील लेख.
1.   इग्रजी       ३,१२३,३0२
2.  हिंदी              ५२,२५८
3.  तेलगू            ४४,१५२
4.  मराठी        २५,८६७ दुवा. -http://mr.wikipedia.org/
5.  बंगाली           २०,४७२
6.  तमीळ            २०,२१५

जर्मनीची लोकसंख्या १00,000,000   इतकी आहे ,त्याचे wiki मधील योगदान  ९९२,६७२  इतके आहे.

४. WordPress च्या वापरात भारत पहिल्या २० देशात येत नाही.म्हणजे यात एकही भारतीय भाषा नाही. त्यातही भारतात महाराष्ट्र १० व्या क्रं. येतो. बघा- http://bit.ly/4QC1wP

५. Best blogs in India
असे शोधल्या वर मला एका साइट वर फ़क्त एक मराठी blog ठळकपणे दिसला. तो म्हणजे चकली.
बघा –  http://bit.ly/YWRkv

६. येथे जावून बघा.
http://en.wikipedia.org/wiki/Cinema_of_India

मला जे सापडले यावरुन मला वाटते, अजून दिल्ली अजुन दुर आहे. जास्तित जास्त लोक मराठी नेट वर लिहण्यात सहभागी व्हावेत. ज्याने मराठीचा प्रसार होइल.

आपणास काय वाटते ते जरुर कळवा.आठवणीने.

– तर्फ़े तंत्रज्ञान (अक्षय)

About CareFree-अनोळखी

नमस्कार मित्रहो, मला नवनवीन तंत्रज्ञान व त्यातील होणारे नवीन शोधांबद्दल जाणुन घ्यायला फ़ार आवडते. त्याचप्रमाणे मला उद्दोजगकांच्या बाबतीत वाचायला आवडते. मराठीत लिहणे हा सुध्दा माझा एक छंदच आहे. मी विद्युतीय व दूरसंभाषण या शाखेत अभियंता आहे.
This entry was posted in प्रवर्ग नसलेले, मराठी विषयी and tagged , , , . Bookmark the permalink.

17 Responses to Internet वरिल मराठीचे स्थान.

 1. Pingback: Tweets that mention Internet वरचे मराठीचे स्थान. « तंत्रज्ञान -- Topsy.com

 2. मनोहर वा. राऊळ says:

  मराठीचा वापर विचार मराठीतून करता आल्यासच शक्य आहे. माझा इंग्रजी माध्यमाला विरोध आहे तो या कारणाने. एरवी इंग्रजीचा दुस्वास करण्याची जरूर नाही.

 3. Nikhil says:

  खुप छान माहिती दिली आहेस.
  ही आकडे्वारी बघुन तर नक्किच मराठी मधे योगदान करनार्यांची संख्या वाढेल; अशी माझी खात्री आहे.

 4. sureshpethe says:

  अक्षय.
  तुझी आकडॆवारीची माहिती उदबोधक आहे. मुख्य अडचण ही आहे की आमचे राज्यकर्ते ह्या बाबतीत नुसतेच उदासीन नाहीत तर दु:स्वास करणारे आहेत. जेव्हा एखादी भाषा राजभाषा बनते तेव्हा तिची प्रगती नक्कीच अधिक जोमाने होते , पण मराठी बाबत असा विचार सुध्दा करणे म्हणजे महापाप आहे असाच समज करून दिला जात आहे !!

  • Akshay says:

   धन्यवाद काका आपल्या प्रतिक्रियेबद्दल. माझे तर म्हणने आहे की, सरकार काय करते यापेक्षा आपणच जे करायचे ते करावे. कारण , आपल्याला मराठीला वाचवायचेच नाही त वाढवायचे सुध्दा आहे.

   • sureshpethe says:

    अक्षय,
    माझ्या म्हणण्याचा मतिथार्थ असा की लाखो लोकांची कामे सरकार दरबारी असतात व सरकार फक्त मराठीतूनच व्यवहार करणार म्हटले की अमराठी चा भरणा कमी होतो. इथल्या मराठींना वाव मिळतॊ व आपोआप भाषा समृध्द होत जाते.

    जेव्हा छ. शिवाजी महाराज व पेशवे मराठीतून कारभार करतात म्हटल्यावर सर्व अगदी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आदी युरोपियन सुध्दा मराठी शिकलेच ना ?

    पण आमचे मराठी खासदार , आमदार ह्यांना कसली भिती वाटते… नव्हे इथल्या मराठीं माणसांची भितीच वाटत नाही म्हणून ते असला बेशरम पणा अगदि उघड उघड करू शकतात !

   • Akshay says:

    @ पेठे काका.
    काका,मला आपला मुद्दा पुर्ण पटला, यात वाद नाही. सरकारला मराठीत बोलायला आपणच भाग पाडू शकतो. आपण म्हटल्याप्रमाणे त्यांना आपली भीती वाटायला हवी प्रथम. ते करायला त आपल्यालाच सुरवात करावी लागेल. मला इतर भागात माहीत नाही,पण विदर्भात मराठी बोलणे हे अडाणी पणाचे लक्षण मानतात.त्यासाठी लोकांनीच न्युनगंड टाकायला हवा, असे माझे म्हणने आहे.

 5. jivanika says:

  खूप संशोधन केलेलं दिसतंय आपण. मीदेखील वरील सर्व प्रतिक्रियांशी सहमत आहे. आपल्या भाषेचा अभिमान असायलाच पाहिजे.

 6. Suhas Zele says:

  अप्रतिम रिसर्च…मराठी webbies ना खूप काम करावा लागेल.

 7. Vijay Deshmukh says:

  वा रे भाउ… एकदम मस्त वाटलं. असाच लिहित रहा.

  विजय देशमुख घाटंजीकर
  जिल्हा यवतमाळ, बरं का !!!

 8. savadhan says:

  छान माहिती दिली आहे. धन्यवाद ! मराठी बोलायची लाज वाटते.अरेरे ! दुर्दैव आहे त्या लोकाचे .दुसरंकाही नाही. मी मराठी न बोलणारास हाक्लून देत असे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s