T.V (दुरदर्शनसंचा) चा इतिहास .

नमस्कार मंडळी ,

दुरदर्शनसंचाराला काही लोक Idiot Box म्हणतात, तर काहि Source of Information.यापॆकी काय खरं आहे ते, प्रत्येकाच वेगळ मत असणार.त्यामुळे मी त्यावर न बोललेलच बर. त्यापेक्षा मी दुरसंचार चा उगम व त्याचे प्रकारावर लिहतो.T.V. चा शोध काही एका माणसाने म्हणुन नाही लावला. पहिले mechnical tv आले ,त्यात प्रगती झाली व electronics tv आलेत. त्यात अजुन शोध लागत जवळ-जवळ १२० वर्षानंतर आज आपल्याला LED TV पहायला मिळतोय. दुरसंचार इतिहास फ़ारच रंजक आहे.ते आपण पाहू.

Television  म्हणजे दुरचे(tele) पाहणे(vision) .हा शब्द Greek व latin या भाषेतून घेतला आहे. tv वर दोन दिशांनी काम सुरु झाले.त्यात एक mechanical tv व दुसरे म्हणजे electronics tv . यात   electronics tv चा विकास झाला व हा संच यशस्वी झाला. पुढे जावून सर्व संच electronics चे झाले.

(आम्हाला मागल्या Sem. मधे tv हा विषय होत.त्यात आम्हाला, फ़ार आधिचा electronics  tv चा प्रकार म्हणजे monochrome tv चा अभ्यास होता.त्या वरचे पुस्तक १९८३ ला लिहले आहे व अजुन ते बदलले नाही.त्यामुळे याविषयाने आमचे ज्ञान किती वृध्दिंगत झाले ते आपल्याला कळ्लेच असेल.असो.)

फ़िरत्या चकरींचे संच.

प्रथम  १८८४ ला Paul Gottlieb Nipkow यांनी वयाच्या २३ व्या वर्षी फ़िरत्या चकरी चा सिध्दान्त मांडला. याच सिध्दान्ताचा उपयोग करुन John Logie Baird यांनी पहीले हलते चित्र १९२४ ला प्रसारित केले.

मनुष्याचे पहिले चलचित्र.

पहिले हलते मनुष्याचे चित्र १९२५ ला प्रसारित झाले.त्यानंतर tv चा विकास झपाट्याने झाला.Farnsworth  यांनी १९३४  ला संपुर्ण electronics चा संच वापरुन प्रथम चित्र प्रसारित केले. त्याच वेळेस Vladimir Zworykin हे देखिल चांगल्या प्रतिचे चित्र कसे पाठवता येइल ,यावर संशोधन करत होते. त्यांनी Kinescope and Iconoscope या CRT(cathode ray tube) चा शोध लावला. CRT चा उपयोग करुनच tv बनवला जायचा आतापर्यत, आता LCD चा शोध लागला आहे .

अत्याधुनिक LED TV.

त्यानंतर tv चा विकास होत गेला. त्यात पुढे रंगाचा विकास झाला व रंगित संच उपलब्ध झाला.यातूनच पुढे NTSC , SECAM ,PAL इ. प्रकार आले.हे tv चे प्रकार आहे. त्यातील NTSC हे अमेरिकेत, SECAM हे फ़्रान्स,रशिया मधे व PAL हे जर्मनी,भारत यादेशात वापरतात. यापुढचे प्रकारही निघाले आहे. आता भारत DVB-T हे संच वापरत आहे.

भारत व दुरसंचार

भारतात दूरदर्शनसंचार चे प्रसारण १९५९ ला सप्टेम्बर ला दिल्लीला सुरु झाले.TV ची खरी प्रगती १९७२ पासुन सुरु झाली.याच वर्षी मुंबईत प्रसारण सेवा सुरु झाली.त्यानंतर लगेचच श्रीनगर,अमॄत्सर,चेन्नई इ. भागात प्रसारण सुरु झाले.

पहिले फ़क्त दुरदर्शन हे एकच सरकारी channel होते .यावर्षी दुरदर्शन ला ५० वर्ष पूर्ण झालीत. खास करुन १९९० पासुन भारतातील channel ची वाढ सुरु झाली.आता भारतात १३ करोड दुरदर्शनसंच आहेत.

अधिक माहीती साठी, बघा- http://bit.ly/Kxzjw

– तर्फ़े तंत्रज्ञान (अक्षय)

About CareFree-अनोळखी

नमस्कार मित्रहो, मला नवनवीन तंत्रज्ञान व त्यातील होणारे नवीन शोधांबद्दल जाणुन घ्यायला फ़ार आवडते. त्याचप्रमाणे मला उद्दोजगकांच्या बाबतीत वाचायला आवडते. मराठीत लिहणे हा सुध्दा माझा एक छंदच आहे. मी विद्युतीय व दूरसंभाषण या शाखेत अभियंता आहे.
This entry was posted in प्रवर्ग नसलेले, Electronics and tagged , , , , , . Bookmark the permalink.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s