Google Wave चं मंच.

सप्रेम नमस्कार ,
Google तसे काही ना काही नविन करण्याच्या मागे लागले असते.त्यातीलच हा प्रकार. Google Wave , google चा नविन मंच. तसा हा काय प्रकार आहे हा प्रश्न आपल्याला पडलाच असेल. साहाजिकच आहे. तर या नव्या मंचाबद्दल अधिक माहीती पाहुया.

Google Wave  हे नविन संगनकिय Internet संपर्क साधन आहे. तसं हे email च काम करत पण पुर्ण संदेश पाठवायच्या एवजी येथे सर्व संदेश एकाच ठीकाणी साठवले जातात.व आपण एकाच वेळी अनेकांसोबत संवाद साधू शकतो. आपल्याला सहजच प्रश्न पडेल की email, facebook इ असल्यावर या नव्या बिरादाची काय गरज. त्याचे उत्तर मी खालिल मुद्दाने देतो.

१. उपयुक्तता.
Google Wave हे real time application आहे.म्हणजे जेव्हा आपण email  वा chat करतो, तेव्हा आपण लिहिलेला संदेश काही वेळाने दुसरयाला पोहोचतो. कारण हा संदेश पहीले आपल्या संगणकातून बाहेर निघुन केबल/तारे द्वारे दुसर्याच्या संगणकापर्यत पोहचतो. कितिही वेग असला तरी काही सेंकंदाचा वेळ तो लागतोच. कारण दोन्ही व्यक्ती दोन वेगवेगळ्या Server वर काम करत आहे.


Google Wave मध्ये या उलट आपण Google च्या server  वर काम करु त्यामुळे दुसर्याने लिहिलेल्या शब्द सुध्दा त्याच क्षणी आपल्याला दिसतो. अगदी मी लिहित असलेला शब्द न शब्द तेव्हाच दिसेल. इतकच नाही तर माझी चुक झाल्यास समोरचा व्यक्ती तबोड्तोब बरोबर करु शकेल.

२. पर्याय.
Google Wave यात अनेक पर्याय आहेत.जसे की आपण rewind करुन पाहु शकतो कि आपलं संभाषण कसं सुरु झाल व कस वाढत गेलं.त्याच प्रमाणे जर आपल्याला कोनासोबत खाजगी बोलायचं असेल तर यात त्याचा पण पर्याय आहे.

३. नाही फ़क्त email.
Google Wave हे फ़क्त email साठिच नाही आहे याचा आपण social networking sites सारखाही उपयोग करु शकतो. येथे आपण टाइमपासही करु शकतो, विविध खेळ खेळून. येथे आपण जगाचे नकाशेही पाहू शकतो.यात अजुन बरेच काही आहे.

४.गंभीर कामे.
Google Wave हे जरी आता मजा करायचा साधन वाटत आसल तरि तस नाही आहे.Google Wave चा वापर करुन विविध कंपन्या आपापल्या लोकांसाठी एक मंच बाधत आहेत.जेथे कंपनीचे email पासुन सर्व कामे होतिल.

५.ओपन सोर्स.
Google Wave हे software  Java या संगणकिय भाषेत लिहिले गेले आहे.Google ,Google Wave चे सर्व code लोकांना देनार आहे.जेणे करून लोक यात बदल करुन त्याना हवं तस sotfware तयार करु शकेल.

६.भाषा.
यात आपोआप शब्द व व्याकरण चुका दुरुस्ती होते. यात ४० विविध भाषेच भाषांतर पण होते.

७. अधिक माहिती.

आपल्यला Google Wave बद्दल अजुन जानुन घ्यायचे असल्यास भेट द्या.
१.  http://en.wikipedia.org/wiki/Google_Wave
२.  http://googlewave.blogspot.com/

या कामाचे श्रेय हे ऒस्ट्रेलियाच्या google चमूला जातं. Google Wave हे officially  release व्हायचं आहे,पण त्याचे १,००,००० लोकांना वापरायला व बदल सुचवायला दिले आहे.

Google Wave हे software appilication आपण बाकी software सारख नाही वापरु शकत. आपल्याला पहिले कोनी निमंत्रंण द्याव लागत ,अजुनतरी. जर आपल्याला Wave चा अनुभव घ्यायचा असेल ,तर मला कळवावे . मी आपल्याला आपल्या  e-mail   वर निमंत्रण पाठविल. तर मग तयार आहात उद्याच्या वेगवान जगात पाउल ठेवायला.
आणि हो जरुर कळवा आपला wave अनुभव , मला व Google ला ही.

– तर्फ़े तंत्रज्ञान (अक्षय).

क.लो.अ.

About CareFree-अनोळखी

नमस्कार मित्रहो, मला नवनवीन तंत्रज्ञान व त्यातील होणारे नवीन शोधांबद्दल जाणुन घ्यायला फ़ार आवडते. त्याचप्रमाणे मला उद्दोजगकांच्या बाबतीत वाचायला आवडते. मराठीत लिहणे हा सुध्दा माझा एक छंदच आहे. मी विद्युतीय व दूरसंभाषण या शाखेत अभियंता आहे.
This entry was posted in प्रवर्ग नसलेले, मराठी विषयी, Computer and tagged , , , . Bookmark the permalink.

15 Responses to Google Wave चं मंच.

 1. Nikhil says:

  Great Review Akshay,
  For me the most amazing part of the Wave is its ‘Translator’. It really does a great job.

 2. हेमंत आठल्ये says:

  मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

 3. savadhan says:

  छान माहिती दिलि आहे धन्यवाद!
  savadhan.wordpress.com
  तर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

 4. Akshay says:

  सप्रेम नमस्कार,
  धन्यवाद सावधान. आपल्या अनुदिनीला मी नेहमीच भेट देतो.

 5. कृपया गुगल वेव्ह साठी निमंत्रण पाठवा.

 6. makarand says:

  lekh khup chahan ahe.
  Plz send me google wave invitation

 7. Prasad Naik says:

  धन्यवाद .. खुपच छान लेख आहेत मी आजच ही साईट बघितली. तुम्ही मला कृपया गुगल वेव्ह साठी निमंत्रण पाठवू शकाल का ????
  प्रसाद

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s