मराठी आमची लॅग्वेज (?) !!

हॅलो फ़्रेन्डस,
कसे आहात आपण. खुप टाइम झाला एकहि पोस्ट मी लिहिली नाही. आज मात्र एनीहावू लिहायचं अस ठरवल व केली स्टार्टिग. फ़ार दिवस झाले माझ्या माईड मध्ये होत की, जरा आपल्या माय मराठी लॅग्वेज बद्दल समथिंग राईट अप करावे. पण, मी जरा वर्कमध्ये बिझी होतो. दॅट्स व्हाय लिहिले नाही .

काय मंडळी, कसा वाटला वरचा उतारा वाचतांना. काही खटकलं की काही खास नाही जाणवलं. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा मराठी उतारा आहे की काही विनोद. फ़ार दिवसांपासून या विषयावर लेख लिहावा असे वाटत होते पण धीर होत नव्हता. एकतर मराठीचा मी काही खास अभ्यास केलेला नाही.( नाही फ़ार तर दहावीत ८६ गुण होते मराठीत.बस एवढच.) आणि दुसरे म्हणजे माझी अनुदिनी तंत्रज्ञान या विषयावर आहे. त्यामुळे लिहावं की नको असं वाटत होतं. पण आता पाणी डोक्यावरुन जायला लागल्यासारखे वाटू लागले. मग मनाचा हिय्या करुन लिहायला बसलो.

जसे संगणकीय भाषा लिहतांना मनात येइल ते शब्द नाहि वापरता येत.तिथे नियमानुसार लिहावे लागते ,तसेच मराठीचेही आहे. मग इथे आपण का कचरतो.

माझे म्हणणे ….
आता पर्यंत आपल्याला माझा मुद्दा लक्षात आलाच असेल. आज काल जे मराठीचे जिकडे-तिकडे लक्तरे फ़ाडणे सुरु आहे त्याबद्दल मी बोलत आहे. आपण कोठेही पहा दुरदर्शन असो, रेडियो असो, वृत्तपत्रे असो , अनुदिनी असो, संकेतस्थळे असो. तिथे जावे तिथे मराठीला रक्तबंबाळ करणे सुरु आहे. सरळ मराठी कोणी लिहित वा बोलतच नाही. त्यात एक दोन इग्रजी शब्द पाहिजेच. बर, ते शब्द जर नाम असेल तर ठीक आहे किंवा ज्याला मराठीत पर्याय नाही (मिनीट, सेकंद) असे असेल तर ठिक. पण जेथे साधे-सोपे मराठी शब्द असतांना, सवयीमुळे वा लोकप्रियतेखातर इग्रजी शब्द वापरतात. असे करणारे जर कमी शिक्षित वा निरक्षर असेल तर आपण समजूनही घेवू. पण असे लिहिणारे मान्यवर पत्रकार, उच्चशिक्षित कलाकार, लोकप्रिय अभिनेते, वार्ताहार, लेखक , अभिय़ंते ….इ असतात.
उदाहरणे-
१. काहि लोक गरज नसतांना जड शब्द वापरतात. जसे वितरण ऎवजी डिस्ट्रिबुशन, मागणी ऎवजी ऑर्डर, शाळा ऎवजी स्कूल इ. यादी फ़ारच लांब आहे , काय करणार.
२. असे लिखाण फ़क्त साधे लोकच करतात असे नाही. पण, वृत्तपत्रेही करतात. लोकसत्ताचा नागपूरहून विदर्भ वृत्तांत येतो. त्यात रविवारी “संण्डे स्पेशल” येतो. त्या ऎवजी “रविवार विषेश” का नाही. तसेच कोणतेहि वृत्तपत्र उघडा तुम्हाला अशी बातमी जरुर आढळेल ” मनसेचे टार्गेट महानगरपालिका व्हाया मुंबई बॅंक “-(साभार सकाळ).
३. आजकाल कोणत्याही दुरदर्शन वाहिनी पाहा. खास करुन व्रुत्तवाहिनी त्यात कार्यक्र्माचे नाव पाहा. “आजचा सवाल” का “आजचा प्रश्न ” म्हटलं तर काय जातं त्याचं. असे अनेक असतील. जमल्यास ibmlokmat च्या संकेतस्थळाला भेट द्या, पाहा किती चुका दिसतात त्या.


गंभीर परिणाम….
आजकाल सर्वाच्या तोडींच चुकिची भाषा रुळ्लीय. असेच राहिले तर तीच प्रमाणित भाषा होइल. तरीही आतापर्यतचे बरेच मोठे लोक मराठी माध्यम शाळेत शिकलेले होते. पण आता तसे नाही बरेच विद्यार्थी इग्रजी माध्यमातून आलेत. मग जर त्यानी मोठ्याचे अनुकरण करुन  चुका केल्यात तर त्यात त्यांची काय दोष . म्हणुन आताच सतर्क व्हावे.

उपाय…
नुसते प्रश्न उपस्तित करुन काय फ़ायदा. नाही तरी आज मराठीसमोर बरेच प्रश्न आहेत. ते कोणी निर्माण केले हे पाहण्यापेक्षा. ते कसे निवारायचे हे पहाणे महत्त्वाचे. माझ्यामते आपणच ते करु शकतो.
१. जर आपण मराठीत अनुदिनी लिहित असातांना, बोलतांना फ़क्त मराठीच शब्द वापरावेत.
२. कोणी वापलेत तर त्याच्या लक्षात आणून द्यावे.( माझ्या लिखाणात आढळल्यास प्रथम कानपिचक्या द्याव्यात.)
३. ज्या संकेतस्थळांवर चुका दिसतात त्यांना विद्युतीय पत्र लिहावे.(मी लोकमत ला लिहिले.)

मला हे संकेतस्थळ सापडले, आपल्याला जरुर कामात येइल.-  ” मराठी शब्द “

त्याच प्रमाणे मराठीतील प्रतिशब्दासाठी चांगले ठिकाण-  http://bit.ly/cvGAR0

यावरिल आपले विचार जरुर कळ्वावे.

– तर्फ़े तंत्रज्ञ (अक्षय)

About CareFree-अनोळखी

नमस्कार मित्रहो, मला नवनवीन तंत्रज्ञान व त्यातील होणारे नवीन शोधांबद्दल जाणुन घ्यायला फ़ार आवडते. त्याचप्रमाणे मला उद्दोजगकांच्या बाबतीत वाचायला आवडते. मराठीत लिहणे हा सुध्दा माझा एक छंदच आहे. मी विद्युतीय व दूरसंभाषण या शाखेत अभियंता आहे.
This entry was posted in मराठी विषयी and tagged , , . Bookmark the permalink.

19 Responses to मराठी आमची लॅग्वेज (?) !!

 1. अक्षय तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे.
  आजकाल मराठी सोबत इंग्रजीच नाही तर हिंदी चा वापर खूप प्रमाणात होताना दिसतो. या बाबतीत आपल्यालाच काळजी घेण आवश्यक आहे. मराठी सोबत हिंदी ऐकल की माझतर टाळकच सरकत.

 2. या विषयावर माझ्याही मनात पुष्कळ दिवसांपासुन खुपतय .माझ्या मराठीला प्रत्येकाने गांभिर्याने घेतले पाहिजे या विषयावर माझे थोडे कठोर मत आहे आणि त्याबाबतचे पालन मि स्वत: करतोच पण महाराष्ट्रातील प्रत्येक रहिवाश्याने असे वागले पाहिजे यासाठी जे काहि प्रयत्न व्हायला पाहिजे त्यात तुमचे प्रयत्न कौतुकास पात्र आहे . आणि तुम्ही माझ्या मनातली इच्छा प्रभाविपणे मांडली या बद्दल धन्यवाद !
  तुम्ही तयार केलेले भित्तिचित्र देखिल अतिशय मार्मिक आहे ……परंतु त्यात जर मराठीची लक्तरे तोडनारा व्यक्ति पण मराठीच असता तर सत्य परिस्थिती दर्शवली गेली असती ……
  असो !!!!!!!!!!
  पुन्हा एकदा आपले आभार !!!
  आणि हार्दिक शुभेच्या !!!

  • नमस्कार प्रमोद,
   अरे तुझे विचार मला पुर्ण पटले.आपल्यालाच सुरुवात करावी लागेल. नाहीतर उद्या पुन्हा रडायची पाळी येइल आपल्यावर. नाहीतरी आजकाल रेल्वे स्थानकावर फ़क्त हिंदीतच पाट्या आहेत(विदर्भात).
   अजुन एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे ज्या रेल्वे गाड्या महाराष्ट्रात येतात वा सुट्रतात. त्यावर पाट्या फ़क्त ३ भाषेत असतात ते म्हणजे हींदी, इग्रजी आणि त्या राज्याची भाषा( जसे हावडा वर बंगाली, सिकंदराबाद वर तेलगू.).
   धन्यवाद चित्र आवडल्याबद्दल, असच काहीतरी.
   क०लो०अ०

 3. मराठी शब्द वापरावे ह्या गोष्टीशी मी सहमत आहे, पण मराठी करणाचा मुद्दाम अट्टाहास धरू नये असे वाटते. यावर पुर्वी एक लेख पण लिहिला होता. बहुतेक आज पण लिहिण्याचा मानस आहे. बघू या..🙂
  आपल्या कडे कार्यालयीन भाषा ही इंग्रजी असल्याने बऱ्याच कार्यालयीन शब्दांच्या साठी इंग्रजी शब्दच वापरले जातात – जसे ऑर्डर वगैरे. हे कोणी मुद्दाम करत नसतो. पण ऑर्डर दिली हे अगदी मराठी मधे इतकं रुळलंय की हा शब्द वापरताना काही चुकतंय असं वाटत नाही.

  • नमस्कार काका, आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
   आपल्याला माझा मुद्दा पटला. ते वाचुन फ़ार बरे वाटले. आणि आपले म्हणने अगदि बरोबर आहे, मराठीचा अतिरेकीपणा करु नये , त्याने आपलेच नुकसान होइल. पण आपण मराठी बोलण्याबाबत सतर्कता नक्कीच बाळगू शकतो.
   आपल्या दुसरा मुद्दाहि खरा आहे, आजकाल आपण काही शब्द फ़ार रुळल्याने नकळत वापरतो. पण त्यासाठी आपल्याला काही पावले तर उचलावीच लागणार न. नाहीतर आपले छान शब्द काळाच्या पडद्या आड जातील.
   नक्कीच आपण यावर लेख लिहा. मी वाट पाहतोय.
   क०लो०अ०

 4. Kiran says:

  marathi writing with unicode is increasing now, but people are either not using right tool or do not care to write error free marathi, why so? that should also stop.

  also, its not necessary to invent marathi nouns for all english ones- like “sukhshma-naram” for microsoft. its overkill

  • नमस्कार किरण,
   आपले अनुदिनी वर स्वागत. आपण म्हणने अगदी बरोबर आहे. कमी माहितीमुळे अस होतय. आणि चुकांबद्दल म्हणाल तर अनुदिनी लिहिणारे जवळपास सर्व जण खुप आधी मराठी शिकले आहे. त्यानंतर बरेच वर्षे त्यांचा मराठीसोबत संपर्क नव्हता (माझाही जवळपास ६ वर्षे). कारण वाचणे आणि लिहणे यात खुप फ़रक आहे. म्हणुन चुका होतात. पण त्यासाठी आपण लिहित असलेल्या लोकांचा उत्साह कमी करणे ठीक नाही. नक्की त्यात सुधारणा व्हाव्यात.
   लिखाणातील चुका आणि सरळ आपल्या शब्दाचा त्याग ह्या दोन निराळ्या गोष्टी आहेत. तसेच हा लेख शुध्दलेखनाबद्दल नव्हता.
   हे माझे म्हणने आहे.जर आपला प्रश्न दुसर्याबाबतीत असेल, तर तसे कळवावे.
   आपले म्हणने अगदि बरोबर आहे. मी पण लेखात नामांबद्दल तसच लिहले आहे.
   क०लो०अ०

 5. मी मराठी says:

  +१ अतिशय योग्य मांडणी. कोणीतरी ही कोंडी फोडायलाच हवी होती. एकूणातच भाषा या गोष्टीबद्दलचा आदर व प्रेम कमी होत आहे. हे यामागचे मूळ कारण आहे.
  -मी मराठी

  • धन्यवाद, मी मराठी. आपले अनुदिनी वर स्वागत असो.
   आज मराठी येत नसल्यास काहिच अडत नाही. ज्या गोष्टीची गरज नसते त्याबद्दलचा आदर व प्रेम कमी होते. यासाठी मराठीला राजाक्षय मिळणे अत्यंत गरजेचे आहे.
   क०लो०अ०

 6. marathi bhashik says:

  येथे सर्वांच्याच लिखाणात इतक्या शुद्धलेखनाच्या चुका आहेत, की मराठीविषयी कितीही कळकळ आपणा सगळ्यांना असली तरी तिचे भवितव्य मला स्पष्ट दिसते.

  (एकमेव अपवाद: मी मराठी)

  • धन्यवाद मराठी भाषिक.आपले अनुदिनीवर स्वागत असो.
   आपले म्हणने पटते.मी चुका दुरुस्त करण्याचा नक्की प्रयत्न करील.
   पण, चुका होताय म्हणजे लिखाण होतय, हे माझ्यासाठी महत्वाचे आहे.

 7. vivek gharpure says:

  it is lazyness. it is difficult to find a suitable marathi word; one may have to look up a thesaurus, ( which may not be available for marathi); or a dictionary or ask someone. it is easy to use a english word instead. there are plenty of useful words in marathi, check dnyaneshwari, full of beautiful words. we just have to learn them, use them, make people familiar with them. i am going to put up a compilation of nice but infrequently used marathi words soon. i don’t have unicode fonts and so am writing in english. will be grateful if someone can send me a link on how to write in devnagari/marathi.
  callisto@sify.com

  • धन्यवाद विवेकजी.आपले अनुदिनीवर स्वागत असो.
   अगदी बरोबर आहे आपले म्हणणे. हा आळसपणाही असू शकतो. आपल्या मराठीत फ़ार सुंदर व सोपे शब्द आहेत. त्यांचा वापर होत नसल्याने ते विसरले जात आहे. आपण सुचलेला प्रकल्प नक्कीच पुर्तीस न्यावे. त्यासाठी शुभेच्या.
   जर आपल्या इग्रजी शब्द मराठीत करायचा असेल तर ही एक जागा आहे. पहा – http://www.khandbahale.com/englishmarathi.php

   ता.क. मराठीत लिहिण्यासाठी लागणार्या सॉफ़्टवेअरचा दुवा मी आपल्या विपत्रावर पाठविला आहे.

 8. प्रिय महेंद्र,

  सप्रेम नमस्कार.

  लेख वाचला. माझे म्हणणे खालीलप्रमाणे.

  १. पत्तन म्हणजे पतन (पडणे) नव्हे. पत्तन म्हणजे descending, alighting, coming down इत्यादी.

  २. अर्थात आपला पत्तन शब्दाशी संबंधच नाही. कारण विमानपत्तन हा केंद्र सरकारी हिंदी पंडितबाबूंनी शोधून काढलेला शब्द आहे. मराठीमध्ये airport साठी विमानतळ असा शब्द आहे आणि त्यात मला काहीच वावगे दिसत नाही. “भारतीय विमानतळ प्राधिकरण’ हा शब्द का अयोग्य वाटतो हे मला समजत नाही. शेवटी एखादा शब्द योग्य की अयोग्य, हलका की बोजड, सुंदर की असुंदर, सोपा की क्लिष्ट, आपलासा की परका हे सर्व आपल्या सवयीवर अवलंबून असते. ऐकून ऐकून एखादा शब्द अंगवळणी (कानवळणी?) पडला की तो आपलासा वाटू लागतो. नाहीतर परका, नकोसा वाटतो, बरेच दिवस न भेटलेल्या मित्रासारखा.

  माझ्या एका पत्रातील काही अंश.

  एखादा शब्द बोजड किंवा हलकाफुलका वाटणे, खटकणे किंवा न खटकणे, हे सर्व सवयीवर अवलंबून असते. सवयीमुळे माणसाला स्वतःच्या घामाचा दुर्गंध जाणवतच नाही. सवयीमुळे तोचतोच शब्द ऐकून ऐकून सोपा-सहज वाटू लागतो. एखादा शब्द अंगवळणी (खरं म्हणजे कानवळणी) पडला की तो बोजड वाटेनासा होतो, खटकेनासा होतो. डिस्ट्रिब्यूशन हा शब्द सहज, सोपा, हलकाफुलका वाटून वितरण, वाटप हे शब्द का खटकावे? मला हे सर्व अनाकलनीय (साध्या-सोप्या (??) इंग्रज्युद्भव शब्दांत – इम्पॉसीबल टू अण्डरस्टॅण्ड) वाटते.

  काही लोकांच्या मते मराठी शब्द जोडाक्षरयुक्त असल्यामुळे उच्चारायला कठीण आणि किचकट असतात आणि म्हणूनच आपण ते वापरत नाही. पण खरं म्हणजे शब्दांचा सतत वापर हेच शब्द रूढ होण्याचे सर्वात मोठे कारण असते. आणि हे तत्व केवळ अर्थपूर्णच नव्हे तर अयोग्य व चुकीच्या शब्दांना देखिल व सोप्याच नव्हे तर बोजड शब्दांना देखिल लागू आहे. त्याचमुळे वितरण किंवा वाटप यापेक्षा डिस्ट्रिब्यूशन हा शब्द आपल्याला लवकर सुचतो. तीच गोष्ट कम्प्लीट (पूर्ण, संपूर्ण, पुरा), स्टार्ट (सुरुवात, आरंभ), स्पीड (वेग), ट्यूसडे (मंगळवार), ब्रेन (मेंदू), इण्टेस्टाईन (आतडे), स्टमक (पोट, जठर), फर्स्ट (पहिला, प्रथम, आधी), लास्ट मंथ (गेला महिना), ड्राय (कोरडा, सुका, वाळलेला), अट्ट्रॅक्टिव्ह (मोहक, आकर्षक, मनोवेधक), एण्ड (शेवट, अखेर), फास्ट (जलद, गतिमान, वेगवान, शीघ्र, जलदगती), स्लो (मंद, संथ, धीमा), मर्डर (हत्या, खून), ऑब्झर्वेशन (निरीक्षण), ग्रेट (महान, थोर, मोठा), एअरोप्लेन/प्लेन (विमान), क्रेझी (चक्रम, वेडपट, मूर्ख, विचित्र, लहरी), ट्वेण्टी-फिफ्थ (पंचवीसावा), प्रॉब्लेम (समस्या, आपत्ती, कटकट, अडचण, अडथळा, अडसर, हरकत, दोष, अपाय, दुखापत), टेन्शन (दडपण, चिंता, ताण, धाकधुक, विवंचना, काळजी), ट्यूसडे ऍण्ड फ्रायडे (मंगळवार आणि शुक्रवार), ग्रुप (गट, संघ, चमू, समूह, झुंड, मंडळ, कळप, जथा, युथ, पथक, टोळी, वृंद, ताफा, वर्ग, संच, गण (शिष्यगण), परिवार (मित्रपरिवार), डिस्ट्रॉय (नाश करणे), क्लोज (बंद), मार्केट (बाजार, मंडई), एक्स्चेंज (अदलाबदल), पोल्यूशन (प्रदूषण), रिक्वेस्ट (विनंती), एट्सेट्रा (इत्यादी)…. अशा अनेक शब्दांची. इंग्रजीमध्ये अक्षरे एकामागून एक वेगळी लिहिली जात असल्यामुळे त्यातील जोडाक्षरे डोळ्यांस दिसत नाहीत, पण बहुसंख्य इंग्रजी शब्दात ती असतातच. त्यामुळे मराठी भाषेतच जोडाक्षरे आहेत हा गैरसमज करून घेऊ नये. खरं पाहता शुद्धलेखन, स्पेलिंग, उच्चार इत्यादी बाबतीत मराठी, किंबहुना सर्वच संस्कृतोद्‌भव भाषा इंग्रजीहून कितीतरी बर्‍या आहेत. पण तरीही सवईने आपल्याला इंग्रजी सोपी वाटते कारण ती तशी डोक्यात बसली असते.

  असे शेकडो-हजारो इंग्रजी शब्द सांगता येतील की ते मराठीहून अधिक क्लिष्ट असूनही आपण मराठी शब्दांबद्दलच नाके मुरडतो पण इंग्रजी शब्द सहजपणे वापरतो. इथे इंग्रजीबद्दलच्या धाकामुळे, आदरामुळे “दुसर्‍याचा तो बाळ्या, आपलं मात्र कारटं”. अशी उलटी म्हण वापरावी लागेल. (किंवा घरातील आईपेक्षा दूरच्या मड्डमेचा रुबाब व धाक अधिक वाटतो.)  

  पुण्यात फुले मंडई हा शब्द बोजड वाटत नाही, पण मुंबईत त्यालाच क्रॉफर्ड मार्केट हा बोजड व परका शब्द अधिक सोपा, साधा, आपलासा वाटतो. मुंबईत पाटीवरील सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, कर्वे रस्ता, भालेराव मार्ग अशी नावे फार कृत्रिम वाटत नाहीत पण पुण्यात मात्र कसोशीने सेनापती बापट रोड, लक्ष्मी रोड, गोखले रोड, टिळक रोड, कर्वे रोड असेच म्हटले/लिहिले जाते.
  —————–
  आता रूढ झालेले अनेक शब्द लोकांना सुरूवातीला खटकले होते. काही मंडळींनी सावरकरांची खूपच टिंगल केली होती. पण आज वाचनालय, नगरपिता (आता नगरसेवक), नगरपालिका, इत्यादी, स्वतः, शासनव्यवस्था, न्यायससंस्था, लोकसभा, राज्यसभा, संसद, राज्यघटना, आमदार, विधानसभा, चळवळ-आंदोलन, राष्ट्रीय एकात्मता, संचारबंदी, असे हजारो शब्द नीटपणे रूढ झाले आहेत.  दिनांक, क्रमांक, अनुक्रमांक, लोकसंख्या, जनगणना, कृपया, नगरपालिका, वाचनालय, शास्त्रज्ञ, सामान्य ज्ञान, अभ्यासक्रम, जीवशास्त्र, आंदोलन, चळवळ, अभियंता, प्रशस्तिपत्र, अर्थसंकल्प, बोलपट, महापौर, स्थायी समिती, स्वाक्षरी, स्थानक, आयुक्त, कोषाध्यक्ष, मध्यंतर, प्रेक्षागृह, टंक, दिनदर्शिका, धनादेश, महापौर, हुतात्मा, स्वनातीत, महाविद्यालय, मुख्याध्यापक, नौदल, दूरध्वनी, दूरदर्शन, चित्रपट, अधोरेखित, नौदल, दूरध्वनी, दूरदर्शन, चित्रपट, अधोरेखित, व्यंगचित्र, क्रीडांगण, उत्तरदायित्व, लाभांश, ध्वनिमुद्रिका, उत्तीर्ण, ध्वनिमुद्रिका, सेवानिवृत्त, पदच्युत, सार्वजनिक, सेवानिवृत्त, पदच्युत, ग्रंथपाल, बलात्कार, नभोवाणी, तथाकथित, बलात्कार, नभोवाणी, तथाकथित, रुग्णालय, प्रमाणपत्र, ध्वनिक्षेपक, इतिवृत्त (रिपोर्ट), बालवाडी, अंगणवाडी, प्रबोधिनी (अकॅडेमी) “इत्यादी”, इत्यादी. यातील बरेचसे शब्द आता इतर भारतीय भाषांमध्येही स्वीकारले जाऊन तिथे देखिल नीट प्रस्थापित झाले आहेत. सावरकरांनी आपले लेख, पुस्तके, नाटके, कविता, भाषणे यांच्या द्वारे हजारो उत्तम, नवीन संस्कृतोद्भव मराठी शब्द प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला व ते बर्‍याच प्रमाणात यशस्वी झाले देखिल. आज असे शब्द मराठी मध्ये इतके एकजीव झाले आहेत की ते  नव्याने योजलेले किंवा प्रचारात नसलेले शब्द होते यावर आपला विश्वासच बसू नये.  अर्थात आज सावरकरादींच्या तोडीचा, मराठी-संस्कृत-इंग्रजी या भाषांचेच नव्हे तर संस्कृतीचे देखिल यथायोग्य ज्ञान असणारा, विद्वान सापडणे कठीणच.

  नीट विचार केला तर – इत्यादी, स्वतः, बलात्कार, सार्वजनिक, असे अनेक (आज साधे वाटणारे) शब्दसुद्धा मराठीत नव्हते जे आपण आज सहजपणे वापरतो हे लक्षात येते. वरीलप्रमाणे विविध नवीन संकल्पनांना प्रतिशब्द योजणे आपण केलेच नसते व बर्‍याच वेळा केवळ षोक म्हणून मराठीत असलेल्या शब्दांच्याजागी हिंदी व इंग्रजी शब्दांचे रोपण चालूच ठेवले असते तर आज मराठीत नव्वद टक्क्यांहून अधिक परकीय शब्द आले असते.  मग तशा भाषेला मराठी म्हणावे की एक इंग्रजी-हिंदीची बोलीभाषा?

  अतिरेक नसावा हे योग्यच. पण ती लक्ष्मणरेषा कशी ठरवायची? दहा शब्दांच्या वाक्यात आठ शब्द इंग्रजी भाषेतील वापरायचे (पल्लवी जोशी) मग ते वाक्य मराठी समजायचे की इंग्रजी? इंग्रज ते वाक्य आपले म्हणून मान्य करतील का? म्हणून त्याला मराठी म्हणायचे का? आणि वर आपण “स्वभाषेचा अभिमान जरूर असावा त्याबद्दल दुमत नाही.” असे म्हणायचे, स्वाभिमान धरायचा तो कोणाच्या भाषेचा?

  माझ्या मते अपरिहार्य व अत्यावश्यक असेल तेव्हा परभाषेतील शब्द जरूर स्वीकारावेत. पण त्यांना मुक्तद्वार ठेवू नये.

  क०लो०अ०

  • धन्यवाद काका आपल्या प्रतिक्रियेबद्दल. आपले अनुदिनीवर स्वागत असो.
   यातील सर्व मुद्दे पटले.
   >> ऐकून ऐकून एखादा शब्द अंगवळणी (कानवळणी?) पडला की तो आपलासा वाटू लागतो. नाहीतर परका, नकोसा वाटतो, बरेच दिवस न भेटलेल्या मित्रासारखा. <<
   हे अगदी खरे आहे. आपल्या प्रतिक्रियेने बरेच प्रश्न निकालात निघाले. फ़ार फ़ार आभार.
   क०लो०अ०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s