हे SEO काय आहे ?

नमस्कार मंडळी,
आपण जर मायाजाळाचा नेहमी वापर करत असाल,पण संगणकाचे तज्ञ नसाल. तर तु्मच्या मनात seo हा शब्द नेहमी प्रश्न निर्माण करत असेल. त्याच प्रमाणे संगणकिय अभियंते बोलतांना नेहमीच, ’ seo ला पर्याय नाही ’, ’संकेतस्थळ लोकप्रिय करण्यासाठी seo माहितीगारला भेटा ’. मी ही वाक्य नेहमी आयकायचो. नंतर मी याचा शोध घेतला. त्याची जी माहिती मला भेटली, ती मी आपल्या समोर मांडत आहे. seo हा फ़ार मोठा विषय आहे. त्यात जितक आत शिरलं तितकी त्याची खोली वाढते. त्यामुळे या लेखात आपण seo ची ओळख व ठळक बाबी जाणून घेउ.

SEO म्हणजे Search Engine Optimisation. ही एक पध्दत आहे ज्याने आपल्या संकेतस्थळावर भेटी देणार्याची संख्या आपण वाढवू शकतो. पण असे करतांना प्रक्रिया अगदी नैसर्गिक असावी म्हणजे त्यावर काही पैसा वा खास algorithm लावले गेले नसावे. यासाठी सरळ शोधयंत्र संकेतस्थळाचा (सर्च इंजिनचा) वापर व्हावा. ते कोणतेही शोधयंत्र संकेतस्थळ विक्रिकलेचा (सर्च इंजिन मारर्केटिंग) वापर न करता व्हावे.

आपणा सर्वाना माहित आहे की गुगल हे सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन आहे. त्यामुळे सर्वाचा ओढा या संकेतस्थळावर आपले पान यादित वर कसे येइल याकडे असतो. त्यासाठीच SEO ची मदत घेतली जाते. SEO चा वापर करुन आपण आपले संकेतस्थळाचे पान SERPs वर अधिका-अधिक वर आणू शकतो. SERPs हे Search Engine Result Pages म्हणजे  शोधयंत्र संकेतस्थळावरिल शोध यादि. जेव्हाही आपण काही शोधतो तेव्हा आपल्या समोर एक यादि येते. जसे खालि पाहा. “मराठी” टाकल्यावर अशी यादी येते.यात आपल्या संकेतस्थळाचे नाव वर असण्यासाठी SEO चा उपयोग होतो.


ही एवढी खटाटोप यासाठी की जेवढे तुमचे पान यादीत वर येइल, तेवढ्या त्यावर होणार्या भेटी वाढतील. SEO चे लक्ष्य वेगवेगले असु शकते. काहि संकेतस्थळासाठी असु शकते तर काही चित्रफ़िती, छायाचित्रे इ. साठी असु शकते.त्याच प्रमाणे शोध यादी प्रत्येक देश व भागा प्रमाणे बदलू शकते. जसे भारतात भारतीय शब्दाला अधिक महत्व असते.जी यादी google.com वर येइल ती google.in वर तशीच येइल असे नाही.त्यात बदल असु शकतो.

एक गंमत – कधी गुगल संकेतस्थळावर गुगल सर्च टाकुन बघा. गुगलचा कितवा नंबर येतो.

SEO हे “शब्द केन्दीत”( Keyword Centric) आहे. इथे शब्दांना खास महत्व आहे. जसे की, http://www.companyname.com http://www.india-fruits.com  यातील दुसरे नाव यादित नेहमीच वर राहिल. असेच SEO चे अनेक बारकावे आहेत.या लेखात सर्व काही लिहिने अशक्यच आहे.

तरी जर आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास येथे पाहवे – http://bit.ly/goqJ

आपल्याला हा लेख कसा वाटला हे करुर कळ्वावे.

– तर्फ़े तंत्रज्ञ (अक्षय)

About CareFree-अनोळखी

नमस्कार मित्रहो, मला नवनवीन तंत्रज्ञान व त्यातील होणारे नवीन शोधांबद्दल जाणुन घ्यायला फ़ार आवडते. त्याचप्रमाणे मला उद्दोजगकांच्या बाबतीत वाचायला आवडते. मराठीत लिहणे हा सुध्दा माझा एक छंदच आहे. मी विद्युतीय व दूरसंभाषण या शाखेत अभियंता आहे.
This entry was posted in मराठी विषयी, Computer and tagged , , , , . Bookmark the permalink.

7 Responses to हे SEO काय आहे ?

 1. अरे व्वा! फ़ारच उपयुक्त माहीती.

 2. bolMJ says:

  Very nice information.
  It will be better if you add some more tips about how to use search engine optimisation technic to optimize our website for google.
  Thanks.

 3. pooja says:

  This is nice information but basic. Can u write more information about SEO ?

 4. Shrikant says:

  खुप छान माहिती आहे…
  सर्व सामान्यांना नेहमीच असे प्रश्न पडत असतात…

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s